Thursday, November 21, 2024
Homeताज्या-बातम्याशिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास 20 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास 20 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

हिंगोली (जिमाका), दि. 03 : महाराष्ट्र शासनाच्या क्रोडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी राज्य शासन शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार. उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार / जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती  पुरस्कार, राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करते. शासनाने नुकत्याच 14 डिसेंबर 2022 च्या शासन निर्णयान्वये शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी नियमावली विहीत केली आहे.

या नियमावलीनुसार सन 2019-20, 2020-21 व 2021-22 या तीन स्वतंत्र वर्षांच्या पुरस्कारासाठी राज्यातील जेष्ठ  क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू यांच्यामार्फत दि. 30 जानेवारी, 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. क्रीडा विभागाच्या http://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करण्यासाठी दि. 20 फेब्रुवारी, 2023 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली असून अर्जाचे नमुने http://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे उपलब्ध आहे. अर्जाचे नमुने प्राप्त करुन व्यवस्थितरित्या भरुन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लिंबाळा मक्ता ता. जि. हिंगोली येथे कार्यालयीन वेळेत दि. 20 फेब्रुवारी, 2023 पर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments