Friday, December 6, 2024
Homeताज्या-बातम्याWeather Forecast: महाराष्ट्रात पुढील ३ दिवस अवकाळी पाऊस कोसळणार; 'या' जिल्ह्यांना झोडपून...

Weather Forecast: महाराष्ट्रात पुढील ३ दिवस अवकाळी पाऊस कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD कडून अलर्ट

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने देशासह राज्यातील काही भागात शुक्रवारी आणि शनिवारी अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. यासोबतच तापमानात वाढ होऊन थंडीचा कडाका कमी होईल, असंही आयएमडीकडून सांगण्यात आलंय. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.

फेब्रुवारीचा दुसरा आठवडा सुरू होताच देशासह राज्यातील हवामानात झपाट्याने बदल होऊ लागला आहे. नागरिकांना पहाटे कडाक्याची थंडी आणि दिवसभर उन्हाच्या झळा जाणवत आहेत. आजपासून पुढील दोन ते तीन दिवस राज्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हवामान खात्याचे म्हणणे आहे की, १० ते १३ फेब्रुवारी दरम्यान मध्य भारतासह पूर्व भारतातील तापमानात वाढ होईल. ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने काही भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील. आजपासून दोन ते तीन दिवस विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज (Rain Alert) वर्तवण्यात आला आहे.

महाराष्ट्रात कुठे-कुठे पडणार पाऊस?

पुणे हवामान विभागाचे विभागप्रमुख. डॉ. के. एस होसाळीकर यांनी ट्वीट करत राज्यातील पावसाचा अंदाज वर्तवणारी माहिती शेअर केली आहे. होसळीकर यांच्या माहितीनुसार, राज्यातील जळगाव, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

याशिवाय विदर्भातील काही भागात देखील हलक्या स्वरुपाचाच पाऊस पडण्याचा अंदाज आहे. शनिवारी गडगडाटी वादळांवर सोबत विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस आणि सोबत वादळी वारे वेग 30-40 किमी प्रति तास जालना , हिंगोली आणि परभणी जिल्हे येथे घडण्याची शक्यता, असं होसळीकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments