Friday, December 6, 2024
Homeताज्या-बातम्याVarsha Gaikwad: 'राज्यभरात डॉक्टरांचा रुग्णांच्या जीवाशी खेळ', वर्षा गायकवाड यांनी राज्य सरकारला...

Varsha Gaikwad: ‘राज्यभरात डॉक्टरांचा रुग्णांच्या जीवाशी खेळ’, वर्षा गायकवाड यांनी राज्य सरकारला विचारला गंभीर प्रश्न

एकीकडे सरकारी रुग्णालयांमधील दुरावस्थेचा प्रश्न बिकट होत चालला असताना दुसऱ्या बाजूला राज्यभरात योग्य पदवी न घेता प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांचा सुळसुळाटही चिंताजनक आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी नसलेले हे डॉक्टर रुग्णांच्या जीवाशी खेळत असून याविरोधात सरकार नेमकं काय धोरण आखणार, असा सवाल वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला. या बनावट पदवीधारक डॉक्टरांविरोधात राज्य सरकारने धोरण तयार करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

मुंबईसारख्या शहरांमध्ये अनेक डॉक्टर परदेशातील विद्यापीठांमधून पदव्या घेतल्याचा दावा करत प्रॅक्टिस करत आहेत. ही विद्यापीठे मान्यताप्राप्त आहेत अथवा नाहीत, त्यांनी नेमकी कोणत्या प्रकारात पदवी घेतली आहे, याबाबतची कोणतीही माहिती नसते. अशा डॉक्टरांनी चुकीचे निदान केल्याने अथवा चुकीचे औषधोपचार केल्याने अनेक रुग्ण दगावण्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे अशा डॉक्टरांना प्रॅक्टिस करण्यापासून थांबवण्याची गरज वर्षा गायकवाड यांनी हिवाळी अधिवेशनात बोलून दाखवली.

या डॉक्टरांविरोधात तक्रार केली, तरी ते न्यायालयात जाऊन स्थगिती घेऊन येतात. त्यामुळे अशा डॉक्टरांना पदवी देऊन सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचं काम सुरू असल्याचा आरोपही गायकवाड यांनी केला. रुग्णांचे नाहक बळी जाऊ नयेत, कोणत्याची चुकीच्या पद्धतीने डॉक्टरांनी प्रॅक्टिस करू नये, यासाठी धोरणात्मक नियम तयार करा, अशी मागणीही त्यांनी केली.

वैद्यकीय शिक्षण मंत्री व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ उत्तर देताना म्हणाले की, परदेशातून एमबीबीएस किंवा पदवी परीक्षा घेऊन आल्यानंतर आमच्याकडे नोंदणी न करता सराव करणाऱ्यांचा हा प्रश्न आहे. आतापर्यंत देशात असे २३ बोगस डॉक्टर आढळले होते. त्यापैकी आपल्याकडे ३ इतके होते. त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई चालू आहे. व सल्लागारांचे मत घेऊन त्यांची पदवी थांबवण्याचा निर्णय घेऊ.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments