Wednesday, October 16, 2024
Homeताज्या-बातम्याUPSC 2023: यूपीएससीच्या निकालात महाराष्ट्राचा डंका; तीन विद्यार्थ्यांची नावे आली समोर

UPSC 2023: यूपीएससीच्या निकालात महाराष्ट्राचा डंका; तीन विद्यार्थ्यांची नावे आली समोर

यूपीएससी परीक्षा 2023 (UPSC 2023) दिलेल्या उमेदवारांसाठी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने आज परिक्षेचा निकाल जाहीर केला आहे. उमेदवारांना अधिकृत (UPSC 2023 Final Result) वेबसाइट upsc.gov.in वर त्यांचा निकाल पाहता येणार आहे. केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या २०२३ च्या परीक्षेत महाराष्ट्रातील तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

यूपीएससीचा निकाल जाहीर झाला आहे. अनिकेत हिरडे, प्रियांका सुरेश मोहीते, अर्चित डोंगरे हे विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती मिळत आहे. अनिकेत हिरडे या विद्यार्थ्याने ८१वा रॅंक, प्रियांका सुरेश मोहीते या विद्यार्थिनीने ५९५वा रॅंक, आणि अर्चित डोंगरे या विद्यार्थ्याने १५३ रॅंक वा रॅंक मिळवून घवघवीत यश संपादन केलं आहे.

केंद्रीय लोक सेवा आयोग २०२३ ची परिक्षा दिलेल्या (UPSC 2023 Result) विद्यार्थ्यांसाठी आज दिलासादायक बातमी आहे. आज त्यांची प्रतिक्षा संपलेली आहे, निकाल जाहीर झालेला आहे. या या परीक्षेमध्ये सर्वसाधारण वर्गातून ३४७, ओबीसी वर्ग ३०३, ईडब्ल्यूएस वर्गातून ११५, एससी वर्ग १६५ आणि एसटी वर्ग ८६ इतके उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेमध्ये एकूण उमेदवारांपैकी १०१६ उमेदवार परीक्षा उत्तीर्ण झाले आहे. तर ३५५ उमेदवारांना प्रोविजनल लिस्टमध्ये ठेवण्यात (UPSC Result News) आलंय.

केंद्रीय लोक सेवा आयोगाची ही परिक्षा ११४३ जागांसाठी झाली होती. यातील १०१६ उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली होती. या परीक्षेमध्ये आदित्य श्रीवास्तव याने प्रथम क्रमांक पटकावला (UPSC 2023 Final Result Maharashtra) आहे. तर अनिमेष प्रधान याने दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर अनन्या रेड्डी हिने तिसरा क्रमांक पटकावला आहे. तसेच चौथ्या क्रमांकांचा मानकरी पीके सिद्धार्थ रामकुमार ठरलेला आहे. निकालामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं (UPSC Final Result) वातावरण आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments