Friday, December 6, 2024
Homeमहाराष्ट्रमराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव निमित्त मॅरेथॉन व चालण्याच्या स्पर्धेचे आयोजन

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव निमित्त मॅरेथॉन व चालण्याच्या स्पर्धेचे आयोजन

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव निमित्त मॅरेथॉन व चालण्याच्या स्पर्धेचे आयोजन हिंगोली (जिमाका), दि. 13 : मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व हिंगोली जिल्हा ॲथलेटीक्स असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 15 सप्टेंबर, 2023 रोजी सकाळी 7.30 वाजता येथील जिल्हा परिषद कन्या शाळा येथे मॅरेथॉन स्पर्धा अंतर्गत पुरुष गट 5 कि.मी. धावणे व महिला गट 3 कि.मी. धावण्याची स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तर दि. 16 सप्टेंबर, 2023 रोजी सकाळी 7.30 वाजता 3 कि.मी. चालण्याची स्पर्धा अंतर्गत 45 वर्षावरील पुरुष गट, महिला गट व खुल्या गटातील पुरुष, महिलांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या मॅरेथॉन व चालण्याच्या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना रोख रक्कम, ट्रॉफी वितरीत करण्यात येणार आहे.पाच कि.मी. धावण्याचा मार्ग जिल्हा परिषद कन्या शाळा येथून सुरुवात होऊन पिपल्स बँक-जुनी नगर परिषद-खुराणा पेट्रोलपंप-जवाहर रोड-इंदिरा चौक-अग्रसेन चौक-जिल्हाधिकारी कार्यालय-नगर परिषद नवीन इमारत-बिरसा मुंडा चौक-जिल्हा परिषद कन्या प्रशाला असा राहील.तीन कि.मी. धावण्याचा मार्ग जिल्हा परिषद कन्या शाळा येथून सुरुवात होऊन पिपल्स बँक-जुनी नगर परिषद-खुराणा पेट्रोलपंप-जवाहर रोड-इंदिरा चौक-अग्रसेन चौक-एमजीपी पाण्याची टाकी-जिल्हा परिषद कन्या प्रशाला असा राहील.या स्पर्धेत हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थी, खेळाडू, क्रीडा प्रेमी व नागरिकांनी सहभाग घेऊन मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव साजरा करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी आर. एस. मारावार यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments