राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर समोर आली आहे. राज्य सरकार प्रति लिटर दुधावर पाच रुपयांचा अनुदान देणार आहे. याबद्दल राज्याचे महसूल आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील थोड्याच वेळात घोषणा करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
प्रति लिटर दुधावर पाच रुपयांच अनुदान देत असताना सहकारी दुध संघाना २९ रुपयांचा दर शेतकऱ्यांना द्यावा लागणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सरकारकडून पाच रुपयांचे अनुदान सरकारी दुध संघाना दिल जाणार आहे. मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा झाल्यानंतर आज याबद्दलची घोषणा होणार आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून दुध दरावरुन उत्पादकांकडून मोठया प्रमाणावर आंदोलन ही करण्यात आली होती त्यानंतर राज्य सरकार ही मोठी घोषणा करणार आहे.