Friday, December 6, 2024
Homeताज्या-बातम्याShivsena Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी,...

Shivsena Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी, कोर्टाच्या निर्णयाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्र प्रकरणी दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मागच्या सुनावणीच्या वेळी कोर्टाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 39 आमदारांना नोटीस पाठवली होती. त्यानंतर आता यावर आज सुनावणी पार पडणार आहे.

मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ही सु्नावणी पार पडणार आहे. आजच्या सुनावणीवेळी कोर्ट या प्रकरणावर सुनावणी घेत की हे प्रकरण मुबई उच्च न्यायालयात पाठवणार हे पाहणे महत्वाचं असेल.

सुप्रीम कोर्टातील वकील सिद्धार्थ शिंदे याबाबत माहिती देताना म्हटलं की, 22 जानेवारीला या प्रकरणी सुनावणी झाली होती. कोर्टाने एकनाथ शिंदे यांच्या 39 आमदारांना नोटीस दिली होती. एकनाथ शिंदे यांचे वकील आज काय युक्तीवाद करतात हे पाहायचं आहे.

याच प्रकरणी भरत गोगावले यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कोर्ट आज केस कोणत्या कोर्टात चालली पाहिजे हे सांगेल. मुंबई हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट कुठे हे प्रकरण चालेल हे आज समजेल, असं सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितलं.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments