राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना देण्यात आल्यानंतर शरद पवार यांच्या गटाला नवं नाव निवडणूक आयोगाकडून देण्यात आलं आहे. शरद पवार गटाकडून आयोगानं तीन नावं मागवली होती त्यांपैकी हे एक नाव आहे. त्यानुसार, निवडणूक आयोगानं शरद पवारांना दिलेलं नाव हे ‘नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ असं असणार आहे.
Sharad Pawar gets a new name for his faction: "Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar"
— ANI (@ANI) February 7, 2024
Yesterday, Election Commission granted Ajit Pawar the NCP name and symbol. pic.twitter.com/i2zRxkyhyz
फक्त राज्यसभा निवडणुकीपर्यंत वैध
आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी तात्पुरत्या स्वरुपात हे नाव शरद पवार यांच्या गटाला देण्यात आलं आहे. या निवडणुकीसाठी पक्ष चिन्हाची गरज नसते त्यामुळं चिन्हावर निवडणूक आयोगानं कुठलाही निर्णय अद्याप दिलेला नाही. त्यामुळं शरद पवार गटाला दिलेलं हे नवं नाव हे राज्यसभा निवडणूक होईपर्यंत अर्थात 27 फेब्रुवारीपर्यंतच वैध असणार आहे.