लातूर : राज्यभरात ट्रक आणि टँकर चालकांनी संप पुकारला आहे. ट्रक चालकांच्या संपाला स्कुल बस चालकांनी देखील पाठिंबा दर्शविला असून या संपात आता स्कूल बस चालक देखील सहभागी होणार आहेत. यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण होणार आहे.
ट्रक चालकांनी ‘हिट अँड रन’ या कायद्याच्या विरोधात दोन दिवसांपासून बंद पुकारला आहे. यामुळे जनजीवनावर याचा अप्रत्यक्षपणे परिणाम झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. मुळात संपामुळे पेट्रोल, डिझेलचा पुरवठा होऊ शकत नसल्याने पंपावरील इंधन संपल्याचे अनेक ठिकाणी पाहण्यास मिळत आहे. लातूर जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावर इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.
स्कुल बस चालकांनीही केली मागणी
दरम्यान ‘हिट अँड रन’ या कायद्याच्या विरोधात आता लातूरमधील स्कूल बस चालक देखील संपावर जाणार असल्याचे सांगितल जात आहे. त्यामुळे तात्काळ हा कायदा रद्द करावा आणि ट्रक, टँकर आणि स्कूल बस चालकांच्या प्रश्नांना न्याय द्यावा; अशी मागणी केली जात आहे.