छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. शहरातील क्रांती चौकात मराठा समाज बांधवांतर्फे रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहण्यास मिळाले.
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र व सगेसोयरेचा कायदा लागू करावा; यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने (Maratha Aarkshan) आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीनगरमध्ये देखील मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनादरम्यान रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न झाला. परंतु पोलिसांनी रोखल्याने आंदोलक व पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचे पाहण्यास मिळाले.
निदर्शने करत घोषणाबाजी
गेल्या दीड ते दोन तासापासून मराठा समाज बांधव हे क्रांती चौकात घोषणाबाजी करत असून जोरदार निदर्शने करत आहे. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात असून काहीही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. तरीही मराठा समाजातील महिला बांधव घोषणाबाजी करत आहे. दरम्यान काही ठिकाणी पोलिसांनी धरपकड देखील केल्याचं चित्र पाहायला मिळाले.