रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशभरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बँकेने आपल्या रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. बँकेच्या या निर्णयामुळे लोकांना दिलासा मिळाला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सलग सहाव्यांदा रेपो रेटमध्ये कोणतीही कपात न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेपो रेट हा ६.५ टक्केच राहणार आहे. या निर्णयामुळे नागरिकांना लोनवर जास्त पैसे द्यावे लागणार नाहीत.
आरबीआयने नवीन कर्जासंबंधितदेखील एक निर्णय घेतला आहे. जे लोक आता नवीन कर्ज घेणार आहेत. त्यांना प्रोसेसिंग फी, डॉक्युमेंटेंशन फी किंवा इतर चार्जेस भरावे लागणार नाहीत. त्यामुळे त्यांना कर्ज घेताना कोणतीही रक्कम भरावी लागणार नाही. ही रक्कम त्यांच्या कर्जाच्या व्याजात जोडली जाणार आहे. या निर्णयामुळे कर्जदारांना कर्ज घेताना कोणतीही रक्कम भरावी लागणार नाही.
याबाबत आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी माहिती दिली आहे. चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआयची चलनविष्यक धोरण समितीची बैठक दर दोन महिन्यांनी होतो. गेल्या वर्षी रेपो रेट दरात वाढ करण्यात आली होती. रोपो रेटमध्ये ०.२५ टक्के वाढ केली होती. त्यानंतर यावेळी रेपो रेट स्थिर असल्याचे सांगण्यात आला आहे.
रेपो रेटचा परिणाम खाजगी बँकावर होत असतो. त्यामुळे बँकेच्या कर्जाचा ईएमआय वाढतो. परंतु रेपो रेटमध्ये कोणताही बदल न झाल्याने ईएमआयच्या किंमतीत वाढ न होण्याचे सांगितले आहे.