Friday, December 6, 2024
Homeमहाराष्ट्रRBIची मोठी कारवाई; इचलकरंजीतील नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द

RBIची मोठी कारवाई; इचलकरंजीतील नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द

भारतीय रिझर्व्ह इचलकरंजी येथील शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बॅक लिमिटेडचा परवाना रद्द केलाय. बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईचा साधन नसल्याचे कारण देत आरबीआयने ही कारवाई केलीय. आरबीआयने बँकेला ४ डिसेंबर २०२३ पासून सर्व प्रकारचे व्यवहार बंद करण्याचे आदेश दिलेत.

कोल्हापुरातील इचलकरंजी येथील शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेडचा परवाना रद्द करण्यात आली असल्याची माहिती रिझर्व बँकेने दिलीय. रिझर्व बँकेकडून कारवाई करत असल्याचं पत्रक जारी केले आहे. येत्या ४ डिसेंबर २०२३ पासून शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेड, इचलकरंजी कोल्हापूर बँकेला कोणत्याही प्रकारची बँकिंग सेवा देण्यास. यासोबतच बँकेत कोणत्याही ठेवी स्वीकारण्यास किंवा पैशाचे व्यवहार करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

बँकेकडे पुरेसं भांडवल आणि कमाईचा साधन नसल्याने सध्याची बँकेची असलेली आर्थिक स्थिती पाहता बँक सध्याच्या ठेवीदारांना पूर्ण पैसे देऊ शकणार नाही. बँकेला बँकिंग सेवा चालू ठेवण्याची परवानगी दिल्यास सार्वजनिक ग्राहकांवर विपरित परिणाम होईल, असे आरबीआयने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

दरम्यान या बँकेमध्ये जमा असलेल्या ग्राहकांच्या पैशाचा संदर्भात देखील त्यांनी पत्रकात माहिती दिलीय. बँक ग्राहकांना ठेवीदार विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर विमा संरक्षणाची सुविधा मिळते. DICGC ही भारतीय रिझर्व्ह बँकेची सब्सिडियरी आहे, जी ५ लाख रुपयांपर्यंत विमा सुविधा प्रदान करते. अशा परिस्थितीत ज्या ग्राहकांनी ५ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी रक्कम बँकेत जमा केली आहे, त्यांना संपूर्ण पैसे परत मिळतील. तर ५ लाख रुपयांपेक्षा जास्त असलेले ग्राहक केवळ ५ लाख रुपयांपर्यंतच्या रकमेसाठी दावा करू शकतील.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments