हिंगोली जिल्ह्यातील धरणे व नद्यांचे पाणी पळवणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या विरोधात पाणी हक्क संघर्ष समितीने आंदोलन सुरू केले आहे. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील मसोड फाटा येथे शेकडो ग्रामस्थांनी हिंगोली- नांदेड राष्ट्रीय महामार्ग रोखला.
या आंदाेलकांनी हिंगोली- नांदेड राष्ट्रीय महामार्ग तब्बल तासभर राेखून धरला. यावेळी आंदाेलकांनी सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आगामी काळात तीव्र आंदाेलन छेडू असा इशारा दिला.
या रास्ता राेकाे आंदाेलनामुळे हिंगाेली नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक खाेळंबली हाेती. या रास्ता रोको आंदोलन दरम्यान प्रशासनाने आंदाेलकांची भेट घेतली. आंदाेलकांना प्रशासकीय अधिकारी यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी हिंगोली- नांदेड राष्ट्रीय महामार्ग माेकळा करुन दिला. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.