Friday, December 6, 2024
Homeताज्या-बातम्याPune Railway Station : पुणे रेल्वे जंक्शनवर मध्यरात्री एका डब्ब्याला आग; अचानक...

Pune Railway Station : पुणे रेल्वे जंक्शनवर मध्यरात्री एका डब्ब्याला आग; अचानक आग लागल्याने धावपळ

पुणे : पुणे रेल्वे जंक्शनवर मध्यरात्रीच्या सुमारास रेल्वेच्या डब्यात अचानक आग लागली होती. रेल्वेचे हे डबे मागील अनेक दिवसांपासून ट्रॅकवर उभे होते. आग लागल्यानंतर वर्दी दलाकडून नायडू, येरवडा, बी.टी. कवडे रोड अग्निशमन केंद्र व मुख्यालयातून एक वाॅटर टँकर अशी एकुण चार वाहने तातडीने पोहचत आग विझविण्यात आली. 

पुणे रेल्वे स्टेशनच्या क्वीन्स गार्डनच्या पाठीमागील बाजूकडे (कॉम्प्रेसर रुमनजीक) क्रमांक चार रेल्वे मार्ग येथे बऱ्याच दिवसापासून उभ्या असलेल्या रेल्वेच्या तीन डब्ब्यापैंकी मधल्या एका डब्ब्याला ही आग लागली होती. आग लागल्याचे निदर्शनास येताच तेथील विद्युत विभागाशी संपर्क साधून विद्युत प्रवाह बंद करण्यात आला होता. यानंतर जवानांनी लगेच पाण्याचा मारा सुरू करत आतमध्ये कोणी प्रवासी अथवा रेल्वे कर्मचारी नसल्याची खात्री केली. सुमारे अर्धा तासात आगीवर नियंत्रण मिळवत पुढे कुलिंग ऑपरेशन सुरू ठेवत रेल्वे कर्मचारी यांच्या मदतीने इतर दोन डबे सुरक्षित ठिकाणी नेले. त्यानंतर आगीवर सतत पाण्याचा मारा सुरू ठेवत आग पुर्ण विझवली. अग्निशमन दलाचे सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी विजय भिलारे व जवळपास वीस जवानांनी आग विझविली.  

आगीचे कारण अस्पष्ट 
अग्निशमन दलाची मदत पोहोचण्यापुर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांनी उपलब्ध असणाऱ्या छोट्या नळीच्या साह्याने पाणी मारत आग विझवण्याचे प्रयत्न केले. घटनास्थळी रेल्वे पोलिस विभागाची मदतही होती. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. सदर घटनेत कोणी जखमी वा जिवितहानी नसून जळालेल्या एका डब्ब्याचे पुर्ण नुकसान झाले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments