मुंबई– महाराष्ट्र राज्य लोकसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. आता एमपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांची मुलाखती आधी वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. महाराष्ट्र शासनाकडून याबाबतचा आदेश काढण्यात आला आहे.(MPSC student update news competitive main exams before interview there will be medical examination)
२०२२ ला हा निर्णय लागू होणार होता मात्र आता २०२३ च्या जाहिरातीच्या मुख्य परीक्षेपासून हा निर्णय लागू होणार आहे.सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात आदेश काढले आहेत. जानेवारी २०२४ च्या पहिल्या महिन्यात वैद्यकीय तपासणीला सुरुवात होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. वैद्यकीय तपासणी आणि मुलाखतीत दिलेला प्राधान्यक्रम पाहून उमेदवाराची नियुक्ती केली जाणार आहे.