नवी दिल्ली- सभागृहात गोंधळ घातल्याप्रकरणी ३१ विरोधक खासदारांचे लोकसभेतून निलंबन करण्यात आले आहे. संपूर्ण हिवाळी अधिवेशनादरम्यान त्यांचे निलंबन कायम असणार आहे.
निलंबित खासदारांमध्ये काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी, डीएमकेचे टी आर बालू आणि दयानिधी मरन आणि टीमसीच्या सौगाता रॉय यांचा समावेश आहे. याआधी संसदेत गोंधळ घातल्याप्रकरणी लोकसभेचे तेरा आणि राज्यसभेच्या एका खासदाराचे निलंबन करण्यात आले होते. त्यामुळे हिवाळी अधिनेशनात कारवाई झालेल्या खासदारांची एकूण संख्या ४५ झाली आहे.