Thursday, November 21, 2024
Homeताज्या-बातम्याMP Assembly Election Exit Poll : मध्य प्रदेशात कोणाची येणार सत्ता, काँग्रेस...

MP Assembly Election Exit Poll : मध्य प्रदेशात कोणाची येणार सत्ता, काँग्रेस की भाजप? काय आहेत एक्झिट पोल

पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाचा एक्झिट पोल समोर आले आहेत. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत आहे. या पोलनुसार मध्यप्रदेशात मतदारांनी काँग्रेसच्या पारड्यात सत्ता दिल्याचं दिसत आहे. दरम्यान मध्य प्रदेशात १७ नोव्हेंबर रोजी मतदान झालं होत आणि याचे निकाल हे ३ डिसेंबर रोजी लागणार आहेत.

मध्य प्रदेश एक्झिट पोलचे निकाल आले असून येथे कॉँग्रेस बहुमताने सरकार स्थापन करत असल्याचं दिसत आहे. परंतु मात्र, पोलमध्ये भाजप खूपच कमी जागांनी काँग्रेसच्या मागे राहत असल्याचं दिसत आहे. यामुळे येथे कडवी स्पर्धा होण्याची शक्यता आहे. ४५ टक्क्यांहून अधिक मते काँग्रेसच्या खात्यात गेल्याचे पोलमध्ये सांगण्यात आले आहे.

पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोल सर्व्हेनुसार मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार स्थापन होणार असल्याचे दिसत आहे. कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुन्हा बहुमताने पुनरागमन करताना दिसत आहे. काँग्रेसने येथील २३० जागांपैकी १११ ते १२१ जागा मिळण्याचा दावा केला जातोय. तर भाजपला १०६ ते ११६ जागा मिळण्याची शक्यता आहे. 

दरम्यान २०१८ मध्ये झालेल्या निवडणुतकीत जसे निकाल लागले होते त्याप्रमाणे यंदाच्या निकाल लागणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे काँग्रेस परत एकदा मध्यप्रदेशमध्ये सत्ता काबीज करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्याचबरोबर भाजप पुन्हा लोट्स ऑपरेशन लागू करेल का अशी भीती देखील व्यक्त केली जात आहे.

इतर संस्थांनी केलेल्या सर्व्हेनुसार

जन की बात

जन की बात’ एक्झिट पोलच्या निकालानुसार, मध्य प्रदेशात भाजपला १०० ते १२३ जागा आणि काँग्रेसला १०२ ते १२५ जागा मिळताना दिसत आहेत. इतरांना ५ जागा मिळतील असे सांगितले जात आहे.

MATRIZE चा काय आहे सर्व्हे

मध्य प्रदेशात भाजपला ११८ ते १३० जागा आणि काँग्रेसला ९७ ते १०७ जागा मिळताना दिसत आहेत. इतरांना ० ते २ जागा मिळताना दिसत आहेत. इतर एजन्सींच्या एक्झिट पोलनुसार, भाजपला मध्य प्रदेशात ११६ जागा मिळताना दिसत आहेत, तर काँग्रेसला १११ जागा मिळतील असं सांगितलं जात आहे. तर इतरांना ३ जागा मिळतील असे सांगितले जात आहे.

रिपब्लिक टीव्हीचा अंदाज

एक्झिट पोलनुसार २३० च्या जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपला ११८ ते १३० जागा मिळतील तर काँग्रेसला ९७ ते १०७ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments