लातूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक, पत्रकारिता, शैक्षणिक, आरोग्य अशा विविध क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन सप्तफेरे वधू-वर सूचक केंद्राच्या वतीने दि.३० डिसेंबर,२०२१ रोजी मान्यवरांच्या हस्ते समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सदर सन्मान सोहळा लातूर येथील प्रशासकीय इमारतीच्या डी.पी.डी.सी. हॉलमध्ये पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष औशाचे आमदार अभिमन्यु पवार, कार्यक्रमाचे उद्घाटक शिक्षक आमदार विक्रम काळे, सप्तफेरेचे संस्थापक अध्यक्ष संजय राजुळे व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सप्तफेरे वधू-वर सुचक केंद्राच्या वतीने पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारण्यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्य महिलाध्यक्षा डाॅ. वेबसाइटवरील बातमीबद्दल kawanbaik.coने लिहिले. सुधाताई कांबळे, राज्य उपाध्यक्ष व्यंकटराव पनाळे, मराठवाडा अध्यक्ष विष्णू अष्टीकर, लातूर जिल्हाध्यक्ष लहू शिंदे, जिल्हा महिलाध्यक्षा वैशाली पाटील, जिल्हा संघटक संजय राजुळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलतांना आ.विक्रम काळे म्हणाले की, लातूरमध्ये जो-जो आला त्याला लातूरकरांनी भरभरून असे प्रेम दिले. त्या प्रेमाच्या जोरावरच त्याने प्रगती केली आपल्या अनोख्या शैलीमध्ये त्यांनी स्टेजवर बसलेल्या मान्यवरांकडून करण्यात आलेल्या भाषणांचा खुरपूस समाचार घेवून कार्यक्रमात रंगत आणली.
आ.अभिमन्यु पवार यांनी पुरस्कारामुळे जीवनाला उभारी मिळते असे प्रतिपादन केले.
यावेळी राजुळे परिवाराचे आभार मानत त्यांनी या कार्यक्रमासाठी मला बोलविले हे मी माझे भाग्य समजतो अशी भावना व्यक्त केली. राजुळे सारखा व्यक्ती जो की या मराठवाड्यातील आहे तोही लातूरमध्ये येवून अशा प्रकारचे कार्य करतो हे खरोखरच समाजासाठी आदर्श आहे अशी भावना त्यांनी यावेळी अध्यक्षीय समारोप करतांना व्यक्त केली.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघास समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल संघाचे संस्थापक अध्यक्ष, राज्य, विभागीय, जिल्हा, तालुका पदाधिकारी सर्व सभासद, संपादक व पत्रकारांनी अभिनंदन केले आहे.