मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा उपोषनाला अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला बसले आहेत. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसींमध्ये मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही. आरक्षणावरून फसवणूक सुरू असल्याचं म्हटलं आहे. शरीराला त्रास देऊन हा लढा देण्याचा उपयोग होणार नाही. जरांगेंनी जालन्यातून अपक्ष लोकसभा निवडणूक लढावावी आणि त्यातून हा प्रश्न मार्गी लावावा असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
राज्य सरकारने काढलेल्या सगेसोयरे अध्यादेशाचा कायदा करावा, तसेच तत्काळ अधिवेशन बोलावून मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी जरांगेंनी केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी राज्य सरकारच्या निषेधार्थ मराठा आंदोलकांकडून बंद पाळण्यात आला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी जरांगेंना आवाहन करताना, ओबीसी च्या ताटातलं आरक्षण टिकणार नाही. ओबीसी आरक्षणाचं ताट वेगळं असलं पाहिजे. शिंदे आयोगासाठी विशेष अधिवेशन बोलावलं असून लोकसभेच्या आधी एक अधिवेशन घ्याव लागेल. हे फसव राजकारण आहे का कळत नाही आहे? असा सवाल त्यांनी केला आहे.
जरांगे निवडून येतील याची खात्री
जरांगे पाटील यांना निरोप दिला आहे, त्यांना हा लढा शरीराचा त्याग करून लढण्याला अर्थ नाही. उपोषणावेळी जागृती करायची होती ती केली. आता महिन्यात लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी कुठल्याही पक्षाचा आधार न घेता स्वतःहून जालन्यात स्वतंत्र्य लढाई लढली पाहिजे.गरीब मराठ्यांचा प्रश्न उद्या कोणासोबत गेले तर लढता येणार नाही. आम्ही आज सूचना पाठवल्या आहेत. त्यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करावी. ते निवडून येतील ही आम्हाला खात्री आहे.