Friday, December 6, 2024
Homeताज्या-बातम्याMaratha Andolan : शिवनेरीवर येताना आरक्षणाचा अद्यादेश घेऊन या; अन्यथा… मराठा आंदोलकांचा...

Maratha Andolan : शिवनेरीवर येताना आरक्षणाचा अद्यादेश घेऊन या; अन्यथा… मराठा आंदोलकांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक झाला असून राज्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन केलं जातंय. राज्य सरकारने सगेसोयरे अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर करून मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी आंदोलक करीत आहेत. तर २१ फेब्रुवारीला विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेऊ, असं आश्वासन राज्य सरकारने दिलंय.अशातच १९ फेब्रुवारीला शिवजयंतीनिमित्त शिवनेरीवर येताना मराठा आरक्षणाचा अद्यादेश घेऊन या, अन्यथा मराठा समाज्याच्या रोषाला सामोरे जावं लागेल, असा इसारा मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.

पुणे नाशिक महामार्ग मराठा आंदोलकांनी रोखला आहे. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठबळ मिळावं यासाठी रास्तारोको आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी महामार्गावर एक तासांपासून मोठी वाहतुककोंडी निर्माण झाली आहे. यावेळी मनोज जरांगेपाटलांच्या आव्हानाचे स्वागत करून आंदोलनातून आंदोलकांनी माघार घेत थेट मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे. किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सवाला येताना मुख्यमत्र्यांनी मराठा आरक्षणाचा अध्यादेश घेऊन यावा, अन्यथा मराठा समाज्याच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाज आक्रमक

छत्रपती संभाजीनगर मध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉभागवत कराड यांच्या कार्यालयासमोर मराठा समाज बांधवांनी ठिय्या मांडलाय. यावेळी समाज बांधवांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शन केलीय.मागील तीन ते चार दिवसापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्तेतील आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या घरासमोर, कार्यालयासमोर मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन केले जात आहे.या अगोदर पालकमंत्री संदिपान भुमरे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आमदार रमेश बोरनारे आणि आता केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या कार्यालयासमोर मराठा समाज बांधव आणि भगिनी ठिय्या आंदोलनासाठी बसलेले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments