Friday, December 6, 2024
Homeताज्या-बातम्याMaratha Aarkshan : मराठा आंदोलकांनी महामंडळाची बस पेटवली; हिंगोली- नांदेड मार्गावरील घटना

Maratha Aarkshan : मराठा आंदोलकांनी महामंडळाची बस पेटवली; हिंगोली- नांदेड मार्गावरील घटना

हिंगोली : मराठा आंदोलकांकडून ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलन केले जात आहे. या दरम्यान हिंगोलीच्या वसमतमध्ये सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनादरम्यान महामंडळाची बस पेटवण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर अग्निशमन दलाने आग विझविली. यात बसचे नुकसान झाले आहे.

मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन सुरु आहे. हिंगोलीत देखील मराठा आंदोलक आक्रमक झाले असून हिंगोली ते नांदेड राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान खांडेगाव पाटीजवळ अज्ञात आंदोलकांनी ही बस पेटवली असून यामध्ये कोणालाही इजा झाली नाही. मात्र बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत अग्निशमन दलाच्या मदतीने पेटवण्यात आलेली बस विझवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यात बसचे मोठे नुकसान झाले आहे. 

नांदेडमध्ये लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या रद्द
नांदेड
 : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषन सुरु आहे. त्यांची तब्येत खालावल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून नांदेड एसटी महामंडळाने लांब पल्याच्या फेऱ्या रद्द केल्या आहेत. नागपूर, अकोला, यवतमाळ, संभाजीनगर आदी मार्गावरील जवळपास दोनशे बस फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे. हदगावला जाणारे बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान एसटी बसेस बंद करण्यात आल्याने प्रवाश्याची तारांबळ उडाली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments