Sunday, December 8, 2024
Homeदक्षिण भारत राज्यMaharashtra Politics: हिंगोलीत ठाकरे गटाला मोठा धक्का; दोन बड्या नेत्यांचा वंचित आघाडीमध्ये...

Maharashtra Politics: हिंगोलीत ठाकरे गटाला मोठा धक्का; दोन बड्या नेत्यांचा वंचित आघाडीमध्ये प्रवेश!

शिवसेना ठाकरे गटाला अकोला- हिंगोलीत वंचित आघाडीने मोठा धक्का दिला आहे. अकोला आणि हिंगोलीत जिल्ह्यातील दोन महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी वंचितचा झेंडा हाती घेतला. ठाकरे शिवसेना गटाचे हिंगोली लोकसभा संघटक डॉ. बी.डी. चव्हाण आणि अकोला जिल्ह्यातील विद्यमान ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हा परिषद सदस्या गायत्री कांबे यांचे पती संगीत कांबे यांनी वंचितमध्ये प्रवेश केला आहे.

अकोला, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. बंजारा समाज व शिवसेनेचे नेते बिडी चव्हाण यांचा वंचितमध्ये प्रवेश झाला आहे. आज सकाळी अकरा वाजता अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड.प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या उपस्थितीत डॉ.बी.डी. चव्हाण यांच्यासह प्रमुख पदाधिकारी 200 ते 300 कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

डॉ.बी.डी. चव्हाण हे 2009 पासून हिंगोली लोकसभा लढवण्यास इच्छुक होते. तब्बल तीन वेळा चव्हाण यांची लोकसभेची उमेदवारी नाकारली गेली. चव्हाण हे वंचितमध्ये प्रवेश करून हिंगोली लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहे, अशी शक्यता आहे. वंचितकडून उमेदवारीही निश्चित असल्याची माहिती आहे. मात्र अद्याप यावर स्पष्ट झालं नाहीये.

चव्हाण यांनी 1997 साली जनता दल पक्षाकडून हिंगोली लोकसभा लढवली होती. नंतर 2009 साली त्यांनी बसपा तर्फे निवडणूक लढवली, तर 2014 मध्ये किनवट विधानसभा त्यांनी लढवली. ज्यात त्याचा थोडक्यात पराभव झाला होता.चव्हाण यांच्या पत्नी डॉ.निकिता चव्हाण या शिवसेना ठाकरे गटाच्या नांदेड जिल्हा महिला संघटक आहेत. त्याही काही दिवसातच अंजलीताई आंबेडकर आणि प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या उपस्थितीत वंचितमध्ये प्रवेश करणार आहे, असे सांगण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments