Wednesday, October 16, 2024
Homeताज्या-बातम्याLok Sabha Election 2024 : उत्तर प्रदेशात 'इंडिया आघाडी' जागावाटप ठरलं! काँग्रेस...

Lok Sabha Election 2024 : उत्तर प्रदेशात ‘इंडिया आघाडी’ जागावाटप ठरलं! काँग्रेस लढणार ‘इतक्या’ जागा

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये जागा वाटप पूर्ण झालं आहे. सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ही माहिती दिली आहे. काँग्रेस उत्तर प्रदेशमध्ये अकरा जागांवर निवडणूक लढवणार आहे. अखिलेश यादव म्हणाले की, काँग्रेससोबतची आमची सौहार्दपूर्ण आघाडी ११ मजबूत जागांसह चांगली सुरुवात करत आहे… ही परंपरा विजयी समीकरणे पुढेही पाहायला मिळेस . ‘इंडिया’ची टीम आणि ‘पीडीए’ची रणनीती इतिहास बदलेल, असेही यादव म्हणाले आहेत.

https://twitter.com/ANI/status/1751154418505191922?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1751154418505191922%7Ctwgr%5E1f3b83e841be0e993bda2b248ea7b9613a408d53%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fpublish.twitter.com%2F%3Furl%3Dhttps%3A%2F%2Ftwitter.com%2FANI%2Fstatus%2F1751154418505191922

सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर काँग्रेससोबत झालेल्या जागावाटपाची घोषणा केली आहे.

सपा-काँग्रेसमध्ये जागांवर शिक्कामोर्तब

उत्तर प्रदेशमध्ये सपाने काँग्रेसला ११ जागा देण्याची घोषणा केली आहे. त्यापैकी रायबरेली आणि अमेठी या दोन जागा विचारात घेतल्या जात आहेत. याशिवाय आणखी कोणत्या नऊ जागा दिल्या आहेत, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. वृत्तानुसार, काँग्रेस पश्चिम उत्तर प्रदेशातील चार जागांवर निवडणूक लढवू शकते. यापैकी एक जागा अमरोहा असू शकते, जिथे कुंवर दानिश अली खासदार आहेत. गेल्या महिन्यात डिसेंबरमध्येच त्यांची बसपातून हकालपट्टी करण्यात आली होती.

पश्चिम उत्तर प्रदेश व्यतिरिक्त पूर्वांचल आणि बुंदेलखंडमध्येही काँग्रेसला जागा दिल्या जाऊ शकतात. या महिन्याच्या अखेरीस जागांबाबत निर्णय घेणार असल्याचे सपा अध्यक्षांनी आधीच सांगितले होते आणि आता सपानेही याची घोषणा केली आहे. मात्र, काँग्रेसकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसला रायबरेलीच्या एकच जागेवर विजय मिळाला होता. तर अमेठीत राहुल गांधींचा पराभव झाला होता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments