Saturday, November 2, 2024
HomeकरियरLoco Pilot Recruitment 2024 : भारतीय रेल्वेमध्ये १० वी पास उमेदवारांना नोकरीची...

Loco Pilot Recruitment 2024 : भारतीय रेल्वेमध्ये १० वी पास उमेदवारांना नोकरीची संधी!

भारतीय रेल्वे विभागांतर्गत २० जानेवारी २०२४ पासून मोठ्या प्रमाणावर भरती सुरू झालेली आहे. ‘सहायक लोको पायलट’ [Assistant Loco Pilot] या पदासाठी एकूण ५,६९६ रिक्त जागांवर भरती सुरू आहे. ज्या उमेदवारांना या नोकरीसाठी अर्ज करायची इच्छा आहे, त्यांनी तो ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी भारतीय रेल्वेच्या https://indianrailways.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही १९ फेब्रुवारी २०२४ ठेवण्यात आलेली आहे.

भारतीय रेल्वे विभागांतर्गत ‘सहायक लोको पायलट’ पदासाठी कोण अर्ज करू शकतो, ते जाणून घ्या. तसेच या पदासाठी शैक्षणिक पात्रता, वेतन आणि अर्ज करण्याची प्रक्रिया यांबद्दल माहिती घेऊ.

Loco Pilot Recruitment 2024 – अर्ज करण्यासाठी थेट लिंक –
https://www.recruitmentrrb.in/#/auth/landing

Loco Pilot Recruitment 2024 – अधिसूचना –
https://drive.google.com/file/d/1FZ0nTTPTlAjJG1iaMwh-wN2jvYRgyWmK/view

Loco Pilot Recruitment 2024 : पात्रता निकष

१. वयोमर्यादा

सहायक लोको पायलट या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे १८ ते ३० वर्षांमधील असणे आवश्यक आहे.

२. शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवाराकडे किमान दहावीपर्यंतचे शिक्षण अथवा एसएसएलसी प्लस आयटीआय [Matriculation / SSLC plus ITI (१० वी / ITI)] असे शिक्षण असणे आवश्यक आहे.

३. रिक्त पदे

भारतीय रेल्वे विभाग – सहायक लोको पायलट – या पदासाठी एकूण पाच हजार ६९६ पदे रिक्त आहेत.

४. वेतन

भारतीय रेल्वे विभाग – सहायक लोको पायलट – सुरुवातीला या पदावर भरती झालेल्या व्यक्तीला १९,९०० रुपये इतके वेतन मिळेल.

५. ऑनलाइन अर्ज करणे

भारतीय रेल्वे विभागांतर्गत सहायक लोको पायलट या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
त्यासाठी भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. अथवा वर दिलेल्या ‘अर्ज करण्याच्या थेट ‘लिंक’वर जाऊन आपला अर्ज भरावा.
त्यासाठी उमेदवारास सर्वप्रथम लिंकवर जाऊन स्वतःचे अकाउंट बनवावे लागेल. त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करावी.
अर्ज भरताना आपली सर्व माहिती योग्य आणि अचूकपणे भरावी.
अर्ज जमा (सबमिट) करण्यापूर्वी पुन्हा सर्व रकाने तपासून, माहिती योग्य रीतीने भरले गेल्याची खात्री करावी.
अर्ज करण्याची अंतिम तारीख ही १९ फेब्रुवारी २०२४ आहे.
अंतिम तारखेनंतर उमेदवारांनी अर्ज केल्यास, तो ग्राह्य मानला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

सहायक लोको पायलट या भरतीसंबंधी इच्छुक उमेदवारांना अधिक माहिती हवी असल्यास वर नमूद केलेली अधिसूचना वाचावी.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments