Saturday, November 2, 2024
Homeक्रीडाJasprit Bumrah ICC Ranking : रँकिंगमध्ये अव्वल स्थान गाठत जसप्रीत बुमराहने इतिहास...

Jasprit Bumrah ICC Ranking : रँकिंगमध्ये अव्वल स्थान गाठत जसप्रीत बुमराहने इतिहास रचला

आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये जसप्रीत बुमराहने अव्वल स्थान पटकवले आहे. इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बुमराहने 9 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे आयसीसी कसोटी बॉलिंग रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावणारा जसप्रीत बुमराह हा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे.

भारताच्या 30 वर्षाच्या जसप्रीत बुमराहने विशाखापट्टणम कसोटीत वेगवान गोलंदाजांना साथ देणारी खेळपट्टी नसतानाही 9 विकेट्स घेत भारताच्या विजयात मोठा वाटा उचलला होता. त्यानंतर त्याच्या आयसीसी रँकिंगमध्ये मोठी प्रगती करत अव्वल स्थान पटकावलं. त्याने विचंद्रन अश्विन, पॅट कमिन्स आणि कगिसो रबाडा रयांना मागं टाकलं.

ज्याने आयसीसी रँकिंगमध्ये अव्वल स्थान मिळवणारा जसप्रीत बुमराह हा भारताचा चौथा गोलंदाज आहे. यापूर्वी बिशन सिंग बेदी, रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजाने अशी कामगिरी केली होती.

जसप्रीत बूमराहला इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सामनावीराचा पुरस्कार देखील देण्यात आला होता. त्याच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर 106 धावांनी भारताने विजय मिळवला.

बुमराहने11 महिन्यापासून अव्वल स्थान आपल्या खिशात ठेवणाऱ्या अश्विनची मक्तेदारी संपवली. बुमराहने 881 रेटिंग पॉईंट्स मिळवले असून तर अश्विनचे 904 आणि रविंद्र जडेजाचे 899 रेटिंग पॉईंट्स आहेत. आयसीसी रँकिंगमध्ये भारतीय गोलंदाजांचेच वर्चस्व आहे. या तिघांचे मिळून सर्वाधिक रेटिंग पॉईंट्स झाले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments