केंद्रीय अर्थसंकल्प आज जाहीर होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे संसदेत बजेट मांडत आहेत. सुरुवातीलाच त्यांनी भारतातील टेक्नोसॅव्ही तरुणांसाठी मोठी घोषणा केली आहे. ५० वर्षांसाठी बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहे.
For the youth, FM Sitharaman says, "For our tech-savvy youth, this will be a golden era. A corpus of Rs 1 lakh crore will be established with 50-year interest-free loan provided. It will be for long-term financing or re-financing with low or nil interest rates." pic.twitter.com/Yw9o7B3yoU
— ANI (@ANI) February 1, 2024
सीतारामन म्हणाल्या “आमच्या टेकसॅव्ही तरुणांसाठी हा सुवर्णकाळ असेल. ५० वर्षांच्या बिनव्याजी कर्जासह 1 लाख कोटी रुपयांचा निधी स्थापन केला जाईल. हा निधी दीर्घकालीन असेल. तसेच याद्वारे कमी किंवा शून्य व्याजदराने वित्तपुरवठा करणे किंवा पुन्हा वित्तपुरवठा करणे, शक्य होईल”