India vs South Africa 2nd Test:
भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरु आहे. हा सामना केपटाऊनच्या न्यूलँड्समध्ये सुरु आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गारने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय गोलंदाजांनी हा निर्णय पूर्णपणे चूकीचा ठरवल्याचे पाहायला मिळाले आहे. भारतीय गोलंदाजांच्या धारदार गोलंदाजीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेचे अवघ्या ४५ धावांवर ७ फलंदाज माघारी परतले आहेत.
Siraj breaks the defence of Dean Elgar. pic.twitter.com/3AGrFL7hgB
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 3, 2024