बीसीसीआयने इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या तीन कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. नव्या चेहऱ्यालाही संघात संधी मिळाली आहे. तर केएल राहुल आणि रवींद्र जडेजा संघात परतले आहेत. याशिवाय विराट कोहलीने आपले नाव मागे घेतले आहे.
🚨 NEWS 🚨#TeamIndia's Squad for final three Tests against England announced.
— BCCI (@BCCI) February 10, 2024
Details 🔽 #INDvENG | @IDFCFIRSTBankhttps://t.co/JPXnyD4WBK
बीसीसीआयने शेवटच्या तीन कसोटींसाठी 17 सदस्यीय टीम इंडियाची घोषणा केली आहे. वेगवान गोलंदाजीमध्ये उपकर्णधार जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि मुकेश कुमार यांच्यासह युवा आकाश दीपचाही संघात समावेश करण्यात आला आहे. फिरकी विभागात रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांच्यासह वॉशिंग्टन सुंदरलाही स्थान मिळाले आहे.
इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या तीन कसोटींसाठी भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक) , रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आकाश दीप.