ॲथलेटिक्स असोसिएशन व शिवजयंती महोत्सव, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ॲथलेटिक्स निवड चाचणी स्पर्धेमध्ये आज दिनांक 18 फेब्रुवारी रोजी विविध वयोगटामध्ये स्पर्धा घेण्यात आली.
आठ वर्षे ,दहा वर्षे आणि बारा वर्षे असे तीन गट करण्यात आले होते .यात धावणे दोन प्रकार तसेच रिले आणि लांब उडी असे चार प्रकार घेण्यात आले.
या स्पर्धेत जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
चारही अथलेटिक्सच्या प्रकारांमध्ये मिळालेल्या एकूण बक्षीसांमध्ये तब्बल 25% हून अधिक बक्षीसे हे केवळ केंद्रीय प्राथमिक शाळा भोसी येथील विद्यार्थ्यांनी पटकावली आहेत
या स्पर्धेसाठी असलेली प्रवेश फीस आपल्या विद्यार्थ्यांना भरण्याची वेळ येऊ नये यासाठी कें प्रा शा भोसी येथील शिक्षकांनी खूप प्रयत्न करून 50 टक्के विद्यार्थ्यांची प्रवेश फीस वाचवली.
उद्या दिनांक 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर हिंगोली येथे मोठ्या थाटामाटात या स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार आहे.
विजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिक व सन्मान चिन्ह देण्यात येईल तर सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात येईल.