बुलढाणा : धनगर समाजाचा आरक्षणासाठी लढा सुरु आहे. याकरिता गेल्या १५ दिवसापासून धनगर समाजाचा युवक नंदू लवंगे हा जिल्हाधिकारी कार्यलयासमोर बेमुदत उपोषणास बसला आहे. परंतु कोणताही निर्णय न झाल्याने आज समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी समाजाच्यावतीने लढा उभारण्यात आला आहे. अनेक ठिकाणी आंदोलन मोर्चा झाल्यानंतर शासनाकडून दखल घेण्यात आलेली नाही. दरम्यान आरक्षणासाठी धनगर समाजाचा युवक नंदू लवंगे हा बेमुदत उपोषणाला बसला आहे. अद्यापपर्यंत सरकारने दखल न घेतल्याने बुलढाणा जिल्ह्यातील धनगर समाज आक्रमक झाला आहे. त्यामुळे ४ दिवसासून जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध आंदोलने करीत आहे.
सरकार विरोधात घोषणाबाजी
आरक्षणासाठी आता धनगर समाज रस्त्यावर उतरला असून आज जिल्हाधिकारी कार्याल्यावर भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्च्यात हजारो महिला- पुरुष सामील झाले होते. या मोर्च्यात सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत उग्र आंदोलन करण्यात येतील असा ईशारा यावेळी देण्यात आला.