Wednesday, October 16, 2024
HomeकरियरCRPF Exam : ‘सीआरपीएफ’ची परीक्षा आता होणार मराठीत! प्रादेशिक भाषांचा समावेश; गृह...

CRPF Exam : ‘सीआरपीएफ’ची परीक्षा आता होणार मराठीत! प्रादेशिक भाषांचा समावेश; गृह मंत्रालयाचा निर्णय

लष्कराबरोबरच केंद्रीय दलांतील भरतीचे ग्रामीण भागातील युवकांना विशेष आकर्षण असते. त्यासाठी ते शारीरिक तंदुरुस्ती प्राप्त करतात. मात्र, इंग्रजी किंवा हिंदी भाषेतील लेखी परीक्षेत तुलनेने कमी गुण पडल्यास त्यांचे स्वप्न अनेकदा अर्धवट राहते. याचीच दखल घेत स्थानिक भाषांमध्ये आता परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे.

केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) कॉन्स्टेबल दलाच्या परीक्षेबाबत गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. सध्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या परीक्षेत इंग्रजी, हिंदीसह १३ प्रादेशिक भाषांमध्ये पेपर देण्यात येणार आहेत. त्यामध्ये मराठी भाषेचाही समावेश आहे.

सीआरपीएफ कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) परीक्षेच्या प्रश्नपत्रिका प्रादेशिक भाषांमध्ये सेट केल्या जातील. कॉन्स्टेबल जीडी परीक्षा ही स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे (एसएससी) आयोजित केलेल्या प्रमुख परीक्षांपैकी एक आहे. ज्यामध्ये देशभरातून लाखो उमेदवार बसतात.

देशभरातील या परीक्षेच्या संदर्भात, गृह मंत्रालय आणि कर्मचारी निवड आयोगाने हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त वरील १३ प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा आयोजित करण्यासाठी एक सामंजस्य करार केला आहे. कर्मचारी निवड आयोगाने (एसएससी) २०२४ मध्ये विविध भाषांमध्ये परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

या भाषांचा समावेश

मराठी, आसामी, बंगाली, गुजराती, मल्याळम, कन्नड, तमीळ, तेलगू, उडिया, उर्दू, पंजाबी, मणिपुरी आणि कोकणी.

भरतीबद्दल थोडक्यात
परीक्षेचा कालावधी : २० फेब्रुवारी ते ७ मार्च

उमेदवार : ४८ लाख

सहभागी शहरे : १२८

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments