Sunday, December 8, 2024
Homeताज्या-बातम्याCBSE Board Exam 2024 : शिवजयंती दिनी 'सीबीएसई' ची परिक्षा नकाे, विद्यार्थ्यांना...

CBSE Board Exam 2024 : शिवजयंती दिनी ‘सीबीएसई’ ची परिक्षा नकाे, विद्यार्थ्यांना सुटी देण्याची ‘मनविसे’ची मागणी

सीबीएसई बोर्डाच्या (cbse board exam 2024) इयत्ता दहावी आणि बारावीच्या अंतिम परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंती (chhatrapati shivaji maharaj jayanti 2024) दिनी संस्कृत विषयाचा पेपर ठेवण्यात आला आहे. शिवजयंती दिनी असलेला पेपर रद्द करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना (maharashtra navnirman vidyarthi sena) यांच्या माध्यमातून साेलापूर येथील प्रशासनास करण्यात आली आहे. 

सीबीएसई बाेर्डाच्या परिक्षेस आजपासून (गुरुवार) देशभरात प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात ही परिक्षा सुरु आहे. साम टीव्हीशी बाेलताना सोलापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल सुर्वे (rahul surve) म्हणाले आजपासून सुरु झालेल्या परिक्षेमधील 19 फेब्रुवारीचा पेपर सीबीएसई बाेर्डाने रद्द करावा.

सीबीएसई बोर्डाच्या वेळापत्रकात संस्कृत या विषयाचा पेपर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी सुट्टी न देता ठेवला आहे. हा पेपर रद्द न केल्यास मनसे विद्यार्थी सेना त्यादिवशी परीक्षा बंद पाडेल असा इशारा सुर्वे यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन मनसे तर्फे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनादेण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments