अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करत आहेत. याची सुरुवात त्यांनी मोदी सरकारने गेल्या 10 वर्षांमध्ये काय-काय केलं हे सांगण्यापासून केली. त्यानंतर त्यांनी विविध घोषणांना सुरूवात केली. यावेळी त्यांनी सांगितलं, की आयुषमान भारत योजनेतील आरोग्य सुविधांचा लाभ आता आशा आणि अंगणवाडी सेविकांना देखील मिळणार आहे. यासोबतच अंगणवाडी मदतनीसांना देखील याचा लाभ मिळेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.
FM Sitharaman announces, "The health cover under the Ayushman Bharat scheme will be extended to all ASHA and Anganwadi workers and helpers." pic.twitter.com/UDNmvoZxqz
— ANI (@ANI) February 1, 2024
आयुषमान भारत योजनेअंतर्गत नागरिकांना दरवर्षी पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा देण्यात येतो. यापूर्वी यामध्ये D1 ते D5 आणि D7 वंचित श्रेणीमधील नागरिकांचा समावेश करण्यात येत होता. मात्र, आता अंगणवाडी कर्मचारी आणि ASHA वर्कर्सनादेखील या योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार घेता येणार आहेत.
आयुषमान योजनेत भारतातील कित्येक खासगी आणि सरकारी रुग्णालयांचा समावेश आहे. यामध्ये कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर देखील उपचार केले जातात.