Saturday, November 2, 2024
Homeताज्या-बातम्याAsha Sevika Morcha : ऑनलाईन कामाची सक्ती अमान्य, अकाेला जिल्हाधिकारी कार्यालयावर आशा...

Asha Sevika Morcha : ऑनलाईन कामाची सक्ती अमान्य, अकाेला जिल्हाधिकारी कार्यालयावर आशा सेविकांचा माेर्चा

विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी आज आशा सेविकांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा काढला. गेले 26 दिवस झाले आशा सेविका राज्यव्यापी संपावर गेल्या आहेत. सरकारने मागण्यांकडे लक्ष द्यावे यासाठी आशा सेविका (asha sevika morcha) घाेषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या. 

आशा सेविकाना दिवाळी पूर्वी रुपये २ हजार रूपये बोनस द्या, पगारात रुपये ७ हजार प्रतिमाहची वाढ करावी तसेच आशा वर्कर्सला ऑनलाईन कामाची सक्ती करु नये आदी मागण्यांसाठी आजचा माेर्चा हाेता.

अकोला शहरातील अशोक वाटिकापासून काढण्यात आलेला हा माेर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. या मोर्चात सुमारे 500 वर आशा सेविका सहभागी झाल्या होत्या. सरकराने आशा सेविकांच्या मागण्या मान्य न केल्यास आगामी काळात तीव्र आंदाेलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments