येत्या सात डिसेंबरपासून विधिमंडळाचे सत्र नागपुरात सुरू होणार आहे. आरक्षण, जातिनिहाय जनगणना व शेतकऱ्यांचे प्रश्न या हिवाळी अधिवेशनात गाजणार आहेत. त्यामुळे या मुद्द्यांवरून सरकारची चांगलीच कसोटी लागणार असल्याचे दिसते.
राज्यात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करून आरक्षण देण्याची मागणी मराठा समाजातील आंदोलनकर्त्यांकडून होत आहे. तर त्यांच्या या मागणीला ओबीसी नेत्यांचा विरोध आहे. (Maharashtra assembly winter session)
मंत्री छगन भुजबळ यांनी तर उघडपणे मराठा समाजाला ओबीसीत समावेश करण्यास विरोध दर्शविला आहे. मंत्र्यांमध्ये असलेल्या मतभेदावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकार मराठा आरक्षणावर ठरावही आणणार असल्याची चर्चा आहे. ठरावानंतरच मराठा आमदारांकडून कोणती भूमिका घेण्यात येते, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दुष्काळासह अन्य मुद्दे उपस्थित होणार
अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे नुकसान झाले आहे. त्यांना वाढीव नुकसान भरपाईची मागणी होत आहे. पाऊस कमी झाल्याने ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला.नागपूर हिवाळी अधिवेशन
महाराष्ट्र विधान मंडळ हिवाळी अधिवेशन २०२३
हिवाळी अधिवेशन २०२३
तर १,०२१ महसूल मंडळात दुष्काळसदृश स्थिती घोषित करण्यात आली. सर्वच महसूल मंडळात दुष्काळ जाहीर करून मदत देण्याची मागणी होत आहे. विविध आयुधांच्या माध्यमातून अनेक सदस्यांनी हे मुद्दे उपस्थित करण्याची तयारी केली आहे.