Wednesday, October 16, 2024
Homeताज्या-बातम्या१ जानेवारीपासून स्वस्त धान्य वाटप बंद; स्वस्त धान्य दुकानदार महासंघाने या कारणाने...

१ जानेवारीपासून स्वस्त धान्य वाटप बंद; स्वस्त धान्य दुकानदार महासंघाने या कारणाने घेतला निर्णय

बुलढाणा : स्वस्त धान्य दुकानदारांच्या काही मागण्या आहेत. ज्या सरकारपुढे ठेवल्या आहेत. परंतु यावर अद्याप निर्णय होत नसल्याने स्वस्त धान्य दुकानदार महासंघाने रेशन वाटप बंद करण्याचा इशारा दिला आहे. ही वाटप नवीन वर्षात अर्थात १ जानेवारीपासून केली जाणार आहे.

ऑल इंडिया फेयर प्राईस डीलर फेडरेशन तसेच अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार केरोसीन परवानाधारक महासंघाच्यावतीने आंदोलन छेडले आहे. १ डिसेंबरला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्या, अडचणी समस्यांबाबत एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यानंतरही निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा महासंघाने दिला आहे. 

दरम्यान ऑल इंडिया फेयर प्राईस ऑफ डीलर फेडरेशनच्या वतीने देशभरातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार १ जानेवारीपासून राज्यासह देशभरात स्वस्त धान्याचे वाटप करणार नाही. जोपर्यंत आपल्या मागण्यांच्या संदर्भात सरकार सहानुभूतीपूर्वक विचार करत नाही, तोपर्यंत राज्यातील व देशातील स्वस्त धान्य दुकाने बंद राहतील. अस राज्याचे स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे उपाध्यक्ष राजेश अंबुस्कर म्हटल आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments