Wednesday, October 16, 2024
Homeमराठवाडाडॉ. हेडगेवार स्मृती रुग्णसेवा मंडळाच्या दंत महाविद्यालयात विशेष बालकांचे स्मितहास्य उजळले

डॉ. हेडगेवार स्मृती रुग्णसेवा मंडळाच्या दंत महाविद्यालयात विशेष बालकांचे स्मितहास्य उजळले

हिंगोली : येथे डॉ. हेडगेवार स्मृती रुग्णसेवा मंडळाच्या दंत महाविद्यालयात विशेष बालकांवर ‘हसत खेळत उपचार’ कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. यामध्ये ‘प्रयास’ केंद्राच्या विशेष बालकांवर नि:शुल्क उपचार करण्यात आले.१४ नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या बाल सप्ताह निमित्त महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांचा समारोप मंगळवारी करण्यात आला. प्रयास केंद्रातील विशेष बालकांच्या दंत तपासणीचा उपक्रम यापूर्वीच घेण्यात आला होता. त्यातील उपचाराची आवश्यकता असलेल्या बालकांवर मंगळवारी नि:शुल्क उपचार करण्यात आले. यामध्ये महाविद्यालयाच्या पेडियाट्रीक अ‍ॅण्ड प्रिव्हेन्टीव्ह डेन्टीस्ट्री विभागातर्पेâ उपचारासहीत दातांची निगा कशी राखावी या विषयावर बालकांना व त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. विशेष म्हणजे या बालकांवर उपचार करणे कठिण असल्याने ‘हसत खेळत उपचार’ ही पद्धत अवलंबविण्यात आली. यामध्ये प्रथम विद्यार्थ्यांना कल्पनाचित्रे काढण्यास देण्यात आली. उपचाराला खेळाचे स्वरूप देऊन करण्यात आलेल्या या उपचारांमुळे प्रयासचे सौ. प्रतिमा गुंडेवार, डॉ. क्षितीजा यल्लारे, प्रविण राऊत, भगवान गव्हाणकर आदींनी महाविद्यालयाचे कौतुक करत आभार मानले. हे उपक्रम विभाग प्रमुख डॉ. बसवप्रभु अक्कारेड्डी, डॉ. मयुर भट्टड, डॉ. सुमित राजेवार व डॉ. अंकिता चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments