Friday, November 22, 2024
Homeताज्या-बातम्याशिक्षकांनी बनविलेल्या माहितीपटाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रकाशन

शिक्षकांनी बनविलेल्या माहितीपटाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रकाशन

हिंगोली येथे स्व. खा. शिवाजीराव देशमुख सभागृहात झालेल्या भव्य शिक्षक काव्य मैफिल कार्यक्रमात मा. जिल्हाधिकारी पापळकर साहेबांच्या हस्ते व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी दैने साहेब, मा. शिक्षणाधिकारी सोनटक्के साहेब व प्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षकांनी बनवलेल्या हिंगोली जिल्ह्यातील ऐतिहासिक , धार्मिक ठिकाणांच्या तथा स्वातंत्र्यसैनिक यांच्या माहितीपटाचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी साहेबांनी माहितीपट बनवणाऱ्या शिक्षकांना व्यासपीठावर बोलावून अभिनंदन केले. हिंगोली जिल्ह्यातील संस्कृती , इतिहास अनेक लोकांपर्यंत पोचविण्याचे कार्य हे माहितीपट करतील असे प्रतिपादन त्यांनी केले.

यामध्ये राजकुमार मोरगे, दिलीप धामणे , मनोहर पोले , दीपक कोकरे, दत्ता पडोळे, बालाजी काळे , विजय बांगर , शंकर लेकुळे, गजानन चौधरी , सुमित यन्नावार , बालाजी तारे, संतोष लोंढे, बळवंत राठोड इत्यादी शिक्षकांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त खास उपक्रमाद्वारे जिल्ह्यातील विविध ऐतिहासिक ठिकाणांचा व स्वातंत्र्य सैनिकांचा प्रत्यक्ष जाऊन व्हिडिओ, फोटो, मुलाखती याद्वारे शोध घेतला होता.

या वेळी प्रमुख उपस्थितीमध्ये उपशिक्षणाधिकारी नेटके साहेब, उपशिक्षणाधिकारी गुंडेवार साहेब, गटशिक्षणाधिकारी नांदे साहेब , गटशिक्षणाधिकारी भोसले साहेब इतर अधिकारी मंडळी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments