हिंगोली :- (प्रतिनिधी)
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभांगाच्या वतीने हिंगोली जिल्हयातील शासकीय वसतिगृहे, शासकिय निवासी शाळा, दिव्यांग शाळा व विजा भज आश्रमशाळा येथे दिनांक 1-09-2023 ते 17-09-2023 या कालावधीत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सवी वर्षे निमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या तसेच सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
सदर कार्यक्रमाचा समारोप म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात दिनांक 17-09-2023 रोजी सकाळी 11.00 वाजता मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सवी वर्षे समारोप कार्यक्रमाचे
अध्यक्षस्थानी मा.श्री.उमेशजी सोनवणे-उपायुक्त, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,हिंगोली व प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री. राजूजी एडके-जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली तसेच दिव्यांग समन्वय समितीचे सर्व सदस्य, मा.श्री. मधुकर राऊत-विस्तार अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली, मा.श्री.श्रीकांत कोरडे-सहाय्यक लेखाधिकारी, प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे .श्री.विशाल इंगोले, इत्यादी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महामानव क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहु महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार-डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. राजू एडके-सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,हिंगोली यांनी तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री. संजयजी बोहरा यांनी केले. तर शेवटी आभार अशोक इंगोले यांनी मानले
प्रथम गंगादेवी देवडा निवासी अंध विद्यालय,हिंगोली या शाळेतील अंध विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीताचे गायन करुन सादरीकरण केले तर नवीन मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थीनीं कु.प्रगती राहूल ढेंबरे या विद्यार्थीनींने मराठवाडा मुक्ती संग्राम या विषयावर गीत गायन केले.
त्यानंतर हिंगोली जिल्हयातील शासकीय वसतिगृह व शासकीय निवासी शाळेतील रांगोळी, निंबध, चित्रकला, वृक्रत्व या विविध स्पर्धेतील 31 विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून कलागूण प्रदर्शन केलेल्या 67 दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, (महाज्योती) नागपूर यांचेकडून विजाभज प्रवर्गातील JEE / NEET / MHT-CET पुर्व परिक्षा प्रशिक्षणासाठी हिंगोली जिल्हयातील 12 पात्र विद्यार्थ्यांना सिमकार्ड सह टॅब उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मोफत वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी 300 ते 350 अशा मोठया संख्येने विद्यार्थी, दिव्यांग सनसमुदाय उपस्थित होता.
सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील सर्व कर्मचारीवृंद यांनी सहकार्य केले.