हिंगोली :-. प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभरून आंध तांडा येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त *” स्नेहरंग 2023 “* या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. डोंगराच्या कुशीत वसलेल्या या तांड्याच्या शाळेमध्ये शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. कार्यक्रमाच्या *अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री भगवानराव जाधव* हे होते. *केंद्रप्रमुख श्री विजयकुमार मानकर सर* हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तर सरपंच श्री डिगांबर राठोड व उपसरपंच श्री विठ्ठलराव जाधव यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन झाले.
या सांस्कृतिक कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनीनी बालगीत,भावगीत , देशभक्तीपर गीत, कोळीनृत्य, बंजारा गीत इत्यादी गीतांवर नृत्य सादर केली. सोबतच मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषेत आपले मनोगत व्यक्त केले. नाटिका , अभिनय,तथा वेशभूषा साकारून सामाजिक संदेश देण्याचेही कार्य केले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त *क्रिडा स्पर्धा* घेण्यात आल्या होत्या त्या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वाटपही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शाळेतील बौद्धिक, शारीरिक,आणि कौशल्यात्मक सर्वांगीण गुणवत्ता प्राप्त असणाऱ्या जय जनार्धन जाधव या विद्यार्थ्याला या वर्षीचा *” शाळारत्न पुरस्कार “* देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री विश्वजित देडे सर यांनी केले. श्री राजकुमार मोरगे सर यांनी सुमधुर असे सूत्रसंचालन केले तर श्री किशोर पालेवर सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील नवतरुण मंडळाने मेहनत घेतली. कार्यक्रमाला सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक,तंटामुक्ती अध्यक्ष , पोलीस पाटील,शा.व्य.समिती अध्यक्ष तथा सदस्य ,सर्व शिक्षक ,शिक्षणप्रेमी,नागरिक व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.