हिंगोली (जिमाका), दि. 18 : मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा दि. 14 जानेवारी ते 28 जानेवारी या कालावधीत साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त मराठीतील विविध ग्रंथांच्या प्रदर्शनाचे आयोजन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय हिंगोली येथे करण्यात आले होते. या ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता सुनिल मुटकुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कनिष्ठ अभियंता अमोल इढोळे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, रामभाऊ पुनसे, दिगांबर झुंजारे व ग्रंथालय पदाधिकारी, वाचक यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रंथप्रदर्शन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नेहरु नगर, रिसाला नाका हिंगोली येथे सर्वांसाठी खुले असून सर्वांनी या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे.