Thursday, November 21, 2024
Homeजाहिरातएफ.सी. बायर्न महाराष्ट्र कप स्पर्धेचे आयोजन

एफ.सी. बायर्न महाराष्ट्र कप स्पर्धेचे आयोजन

राज्यात फुटबॉल खेळाच्या विकास व प्रसारासाठी फुटबॉल क्लब बायर्न म्युनिक, जर्मनी यांचेशी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने रोजी करारनामा झाला आहे. फुटबॉल क्लब बायर्न म्युनिक जर्मनी हा जागतिक अग्रगण्य लोकप्रिय फुटबॉल क्लवांपैकी एक आहे. या करारनाम्यामुळे राज्यातील फुटबॉल खेळाची लोकप्रियता वाढीस लागेल, खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांना फुटबॉल खेळातील तांत्रिक प्रशिक्षण, क्रीडा नैपुण्याचा शोध घेण्यासाठी तसेच योजनावद्ध प्रशिक्षण, पायाभुत सुविधा यांना चालणा मिळणार आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच फुटबॉल क्लव बायर्न यांचे करारामध्ये क्रीडा नैपुण्याचा शोध घेवून त्यांना जर्मन येथे प्रशिक्षण देण्यासाठी मुद्दा नमुद असून या अंतर्गत राज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या एफ.सी. बायनं महाराष्ट्र कप स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. फुटबॉल क्लब बायर्न यांच्याशी इ आलेल्या करारनाम्यामुळे राज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धा आयोजित करून, त्यातून निवडलेल्या २०. खेळाडूंना म्युनिक, जर्मनी येथे जाणे-येणे तेथील निवास, प्रशिक्षण इ. बाबीवरील खर्च करण्यात येणार आहे. फुटबॉल क्लब बायर्न यांचा लोगो वापरण्याची मुभा दिलेली आहे. तसेच एफ.सी. बायर्न महाराष्ट्र कप टी. व्ही ९ मराठी हे मिडीया पार्टनर आहेत.

राज्यातून २० खेळाडू जर्मनी येथे सदर प्रशिक्षणासाठी जाण्याकरीता क्रीडा नैपुण्याचा शोध घेण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा परिषद अंतर्गत एफ.सी. बावनं महाराष्ट्र कप स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर करण्यात येणार आहे. या फुटबॉल स्पर्धा १४ वर्षाखालील मुलांच्या गटात घेण्यात येणार आहे. त्याचा तपशिल खालील प्रमाणे आहे.

वयोगट १४ वर्षाखालील मुले,जन्म दिनांक०१/०१/२००९ नंतर जन्मलेला असावा. खेळाडू संख्या मुले २०,मार्गदर्शक व व्यवस्थापक २ एकुण मुली २२ आसावे.

जिल्हास्तर एफ.सी. बायर्न महाराष्ट्र कप (१४ वर्षाखालील मुले) स्पर्धेसाठी शाळांचे प्रवेश अर्ज दिनांक ०१ ते ०६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे सादर करावे. स्पर्धेचे तारीख व स्थळ लवकरच कळविण्यात येणार असून जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था, शाळा, फुलबॉल क्लॅब, फुटबॉल संघटना यांनी याची नोंद घेउन जास्तीत जास्त १४ वर्षाखालील मुलांच्या सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments