Tuesday, December 3, 2024
Homeविदर्भआमदार तान्हाजी मुटकुळे यांनी विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीचे दर्शन घेतले.

आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीचे दर्शन घेतले.

हिंगोली विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून पुन्हा उमेदवारी जाहिर होताच विद्यमान आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीचे दर्शन घेतले.

विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सूकता मतदारांना होती. भाजपाकडून विद्यमान आमदार तान्हाजी मुटकुळे, मागील दोन निवडणुकांमधून आमदार मुटकुळे यांनी हिंगोली विधानसभेचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यामुळे यावेळी त्यांना उमेदवारी मिळणार का किंवा नवीन उमेदवार दिला जाणार याची उत्सूकता मतदारांसह भाजपाच्या कार्यकर्त्यांनाही होती. त्यानंतर भाजपाने पहिल्याच यादीतच विद्यमान आमदारतान्हाजी मुटकुळे यांच्या नावाची घोषणा केली.

यावेळी भाजपा चे विद्यमान आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी नवसाला पावणारा मोदकाचा गणपती म्हणून प्रसिध्द असलेल्या विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीचे दर्शन घेतले. त्याठिकाणी पूजा केल्यानंतर जलेश्वर महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी जनसेवा करण्याची पुन्हा एकदा संधी देण्याचे साकडे घातले. यावेळी माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, तालुकाध्यक्ष संतोष टेकाळे, प्रशांत सोनी, कैलास काबरा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments