जिल्हा प्रतिनिधी :- बाळू जाधव
आमदार तान्हाजीराव मुटकुळे मागील काही वर्षापासून आदर्श कॉलेज परिसरात सर्वात जुन्या दोन टाक्या आहेत परंतु या भागामध्ये वाढलेली लोकसंख्या व नवीन नगरे या टाकीला जोडल्यामुळे आठ ते दहा दिवसात केवळ 40 मिनिटं पाणीपुरवठा होत आहे.
पाण्याच्या टाक्यांची स्वच्छतेचा प्रश्नही ऐरणीवर आहे. त्या अनुषंगाने आज दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी आदर्श कॉलनी, हिल टॉप कॉलनी, संमती कॉलनी, विवेकानंद नगर, गोविंद नगर, जिजामाता नगर, लाला लजपत राय नगर या भागातील जवळजवळ शंभर नागरिकांनी हिंगोली विधानसभेचे आमदार तान्हाजीराव मुटकुळे साहेब यांची रेस्ट हाऊस हिंगोली या ठिकाणी भेट घेऊन पाणी व लाईट, रस्ते या मुख्य प्रश्नाबद्दल माहिती दिली.
तेव्हा जवळ शहर विकासासाठी आमदार मुटकुळे साहेब यांच्या माध्यमातून 82 कोटीचा प्रस्ताव एकनाथ शिंदे साहेब (मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ) यांच्याकडे स्वाक्षरी साठी आहे. इतर कामाबरोबर शहरांमध्ये नव्याने दहा पाण्याच्या टाक्यांचे बांधण्याचे काम या निधीमधून होणार आहे.
आदर्श कॉलेज परिसरात जुन्या झालेल्या दोन्ही टाक्या डीसमेंटल करून नव्याने लवकरच बांधकाम होणार आहे. अशी माहिती आमदार मुटकुळे यांनी सर्व उपस्थितांसमोर संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांशी बोलून दिलेली आहे. लवकरच इतर कॉलनीतील अंतर्गत रस्त्याचे कामही लवकर पूर्ण होईल. आदर्श कॉलेज परिसरातील पोलीस चौकी बाबतही एसपी ना सुद्धा सागून साहेब असे आमदार मुटकुळे यांनी सांगितले.
पाणी प्रश्न व लाईट प्रश्न व इतर प्रश्न लवकर सुटणार याबद्दल आमदार यांनी उपस्थितांना अवगत केले. सर्व उपस्थित नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आणी आमदार मुटकुळे यांचे आभारही व्यक्त केले. यावेळी त्या परिसरातील शंभर पेक्षा अधिक नागरिक उपस्थित होते .