Thursday, November 21, 2024
Homeताज्या-बातम्या2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या 13 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत 1210...

2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या 13 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत 1210 उमेदवार रिंगणात

2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत 88 लोकसभा मतदारसंघांत 2633 उमेदवारी अर्ज दाखल.

पी.आई.बी. – लोकसभा निवडणुक 2024 च्या दुसऱ्या टप्प्यात 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील 1206 उमेदवार आणि बाह्य मणिपूर लोकसभा मतदारसंघाचे 4 उमेदवार, निवडणूक लढवणार आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत 88 लोकसभा मतदारसंघांत 2633 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील मतदानाकरिता सर्व 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 4 एप्रिल 2024 होती. दाखल झालेल्या 2633 नामांकन अर्जांच्या छाननीनंतर 1428 अर्ज वैध असल्याचे समोर आले. सर्व 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 8 एप्रिलपर्यंत होती.

दुसऱ्या टप्प्यात केरळमध्ये 20 लोकसभा मतदारसंघांत निवडणूक होत असून तेथून सर्वाधिक म्हणजे 500 अर्ज दाखल झाले आहेत.त्यापाठोपाठ कर्नाटकचा क्रमांक लागतो. तेथे 14 लोकसभा मतदारसंघांत 491 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्रिपुरातील एका मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे 14 अर्ज दाखल झाले आहेत. महाराष्ट्रातील 16-नांदेड लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक 92 अर्ज भरले गेले आहेत.

लोकसभा निवडणूक -2024 च्या दुसऱ्या टप्प्याचे राज्य/केंद्रशासित प्रदेशनिहाय तपशील :-

State/UTNumber of PCsNomination forms receivedValid candidates after scrutinyAfter withdrawal, final ContestingCandidates 
Assam51186261
Bihar51465550
Chhattisgarh3954641
Jammu and Kashmir1372322
Karnataka14491300247
Kerala20500204194
Madhya Pradesh71579388
Maharashtra8477299204
Rajasthan13304191152
Tripura114149
Uttar Pradesh82269491
West Bengal3684747
Total88263314281206

बाह्य मणिपूर लोकसभा मतदारसंघातील 15 विधानसभा मतदारसंघांत पहिल्या टप्प्यात म्हणजे 19.04.2024 या दिवशी मतदान होत असल्याची नोंद घ्यावी. तर येथील 13 विधानसभा मतदारसंघांत दुसऱ्या टप्प्यात म्हणजे 26.04.2024 या दिवशी मतदान होणार आहे. 5 एप्रिल 2024 च्या भारतीय राजपत्राद्वारे अधिसूचित केल्यानुसार, बाह्य मणिपूर लोकसभा मतदारसंघातून 4 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. एकंदरीत, पहिल्या टप्प्यासाठी, 21 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतून 1625 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून, त्यांत 1491 पुरुष उमेदवारांचा व 134 महिला  उमेदवारांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments