गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये (MVA Seat Sharing) सांगली, भिवंडी, तसेच मुंबईतील काही जागा वाटपावरुन वाद सुरू होता. शिवालय कार्यालयात आज महाविकास आघाडीची तसेच इंडिया आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली आहे. यामध्ये आता सांगलीच्या जागेचा (Sangli Lok Sabha Constituency) तिढा मिटला आहे. आता सांगलीमधून महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील (MVA Candidate Chandrahar Patil) यांचं नाव फायनल करण्यात आलं आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. आता ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील निवडणूक (Maharashta Election) लढवणार आहे. या जागेसाठी कॉंग्रेस देखील आग्रही असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. अखेर या जागेचा तिढा मिटला असून ही जागा ठाकरे गटाला (Thackeray Group) देण्यात आली आहे.
लोकसभा निवडणूक 2024 साठी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. शिवसेनेला एकवीस जागा, कॉंग्रेसला १७ जागा तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला दहा जागा वाटप करण्यात आलं ( Lok Sabha Election 2024) आहे. सांगलीतील काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील आणि ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील दोघेही आग्रही होते. दोघांपैकी कुणाला जागा मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
सांगलीच्या जागेवर अनेकदा कॉंग्रेसने दावा केल्याचं समोर आलं होतं. परंतु आता सांगली लोकसभेची माळ चंद्रहार पाटलांच्या (Chandrahar Patil) गळ्यात पडली आहे. आता राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. काल संजय राऊत यांच्यासोबत चंद्रहार पाटील मुंबईला देखील गेल्याचं (Lok Sabha) समोर आलं होतं. महाविकास आघाडीचा सांगलीच्या जागेचा तिढा मिटला आहे. सांगली लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांचं नाव फायनल करण्यात आलं आहे.