Thursday, November 21, 2024
Homeताज्या-बातम्याRTE Admission : आरटीई प्रवेशासाठी ५ एप्रिलनंतर विद्यार्थी नोंदणी; प्रवेशासाठीच्या जागा वाढल्या

RTE Admission : आरटीई प्रवेशासाठी ५ एप्रिलनंतर विद्यार्थी नोंदणी; प्रवेशासाठीच्या जागा वाढल्या

शालेय शिक्षण विभागाने शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आरटीई  प्रवेशांतर्गत मोफत प्रवेश दिला जातो. मात्र शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेत यंदा बदल केले आहेत. या बदलांमुळे आरटीईच्या प्रवेशासाठी जागा वाढल्या आहेत. आता या प्रवेशासाठी ५ एप्रिलनंतर विद्यार्थी नोंदणी करता येणार आहे.

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांतील २५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेश दिला जातो. त्यात इंग्रजी शाळांचे प्रमाण अधिक असते. हि संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविली जात असून विद्यार्थ्यांची नोंदणी केल्यानंतर सोडत काढून प्रवेश निश्चित केला जात असतो. २०२४- २५ या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात येणार असून ५ एप्रिलनंतर विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यास सुरवात होणार आहे. 

यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत यंदा बदल केले असून राज्यभरात ७५ हजार ८५६ शाळांमधील ९ लाख ७१ हजार २२३ जागा आता प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत. येत्या आठवड्यात म्हणजे ५ एप्रिलनंतर ही विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३ हजार ५७० पैकी २ हजार ८१६ शाळांनी नोंदणी केलेली असून जिल्ह्यातील क्षमता ४० हजार ४५७ इतकी आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments