राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लगबग सुरू आहे. महाविकास आघाडी आणि शिवसेना ठाकरे गटाचे यवतमाळ वाशिमचे उमेदवार संजय देशमुख यांनी लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल केला. संजय देशमुख यांचा अर्ज दाखल करण्यासाठी आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यवतमाळमध्ये दाखल झाले होते. यावेळी यवतमाळच्या पोस्टल ग्राउंडमध्ये आदित्य ठाकरेंची जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना त्यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
“देशात वातावरण बदलत आहे. परिवर्तनाचे वारे वाहायला लागलेले आहेत आणि मलाही खात्री पटलेली आहे. गेले दोन अडीच वर्ष जे काही मी महाराष्ट्रात पाहत आहे प्रत्येक कानाकोपऱ्यात पाहत आहे. जो बदल घडणार आहे तो बदल घडवण्यामध्ये सगळ्यात अग्रेसर राज्य जे असेल तो आपला महाराष्ट्र असेल आपला स्वाभिमानी महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र कधी अन्याय सहन करत नाही,” असे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले.
“भाजपाच्या विरोधात लढाई लढत आहोत. भ्रष्टाचारी लोकांच्या विरोधात लढत आहेत म्हणूनदोन मुख्यमंत्र्यांना अटक केली. भाजपने आपल्या देशाची बदनामी जगभरात झालेली आहे. ईडी, सीबीआय भाजपचे मित्रपक्ष झालेत,” अशी टीका करत यवतमाळ वाशिम आपण जिंकणारचं, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
रोहित पवारांचे टीकास्त्र..
“महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) मशाल चिन्हावर संजयजी देशमुखचे उभे आहेत. त्यांच्या पाठीमागे आपल्या सर्वांना उभे राहायचं आहे. संजयजी राठोड साहेबांना कदाचित तिथे तिकीट मिळू शकत भावनिक राजकारण चालणार नाही. समजा चुकून जर संजय राठोड यांना तिकीट मिळाली तर चित्र वाघ यांना बोलणार,” असा टोला रोहित पवार यांनी लगावला.