Thursday, November 21, 2024
Homeदक्षिण भारत राज्यआमदारांच्या नावाचं स्टिकर लावून अवैध वाळू वाहतूक? बड्या नेत्याच्या आरोपामुळे खळबळ

आमदारांच्या नावाचं स्टिकर लावून अवैध वाळू वाहतूक? बड्या नेत्याच्या आरोपामुळे खळबळ

हिंगोलीत आमदारांच्या नावाने गंभीर प्रकार सुरू आहे. खाजगी वाहनावर विधानसभा सदस्य स्टिकर लावून अवैध प्रकार होत आहेत, असा आरोप भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी केला आहे. आमदार मुटकुळे यांच्या यासंदर्भात लेखी तक्रार दिली.

हिंगोलीत आमदाराच्या नावाने गैरप्रकार सुरू आहेत. चारचाकी वाहनांवर विधानसभा सदस्य असल्याचे स्टिकर लावले जाते. त्यानंतर गाडीमध्ये शस्त्र ठेवले जातात, अशी तक्रार भाजप आमदाराने केली आहे. या तक्रारीनंतर हिंगोलीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी विधानसभा स्टिकर असणाऱ्या गाड्यांवर कार्यवाही करण्याचे लेखी आदेश दिले आहेत.

हिंगोलीत आमदारांच्या नावाचा गैरवापर

हिंगोली जिल्ह्यात आमदारांच्या नावाने गैरप्रकार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. चार चाकी वाहनांवर विधानसभा सदस्य नावाचं स्टिकर लावून अनेकजण स्वतः आमदार असल्यासारखं वागत आहेत, असा आरोप भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी केला आहे.

हिंगोलीत वाहनांवर आमदारांच्या नावाचं स्टिकर लावून अवैध वाळू वाहतुक सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. आमदारांच्या नावाने स्टिकर लावलेल्या गाड्यांमध्ये अवैध शस्त्र आहेत. हे वाहनचालक अवैध वाळू वाहतुकीसाठी हे वाहन वापरत आहेत.

हिंगोली जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर

प्रशासनावर दबाव टाकण्यासाठी हे सगळं सुरू असल्याचं मुटकुळे म्हणाले आहेत. आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या तक्रारीनंतर हिंगोली जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी तातडीने या वाहनांवर कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस व आरटीओ अधिकाऱ्यांना दिले आहेत.

या घटनेमुळे हिंगोलीमध्ये खळबळ उडाली आहे. आता अशा नेमप्लेट असलेल्या वाहनांवर कारवाई केली जाणार असल्याचं जिल्हा प्रशासनाने सांगितलं आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments