Thursday, November 21, 2024
Homeताज्या-बातम्याभारतीय प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात संबंधित विभागाने आपणास दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी...

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात संबंधित विभागाने आपणास दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

हिंगोली (जिमाका), दि. 23 : येत्या 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचा 73 वा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. याप्रसंगी आपणास दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज केले.

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पूर्वतयारीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, तहसीलदार नवनाथ वगवाड आणि सर्व संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित होते.

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम 26 जानेवारी रोजी  सकाळी 9.15 वाजता संत नामदेव पोलीस कवायत मैदान येथे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते होणार आहे. तर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते सकाळी 8.00 वाजता ध्वजारोहण होणार आहे.

कार्यक्रम स्थळी नागरिकांच्या आसनाची व्यवस्था, परिसर स्वच्छता, ध्वनीक्षेपण व्यवस्था आदी करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची राहील. नगर परिषदेने मैदानाची साफसफाई, पिण्याची पाण्याची व्यवस्था करावी. शिक्षणाधिकारी यांनी वृक्षारोपण, देशभक्तीपर गीत, वक्तृत्व स्पर्धा असे उपक्रम राबवावेत. तर विद्युत विभागाने त्या दिवशी विज पुरवठा सुरळीत राहील याची काळजी घ्यावी. तसेच कार्यक्रमस्थळी आरोग्य पथक आणि रुग्णवाहिका तत्पर असणे अपेक्षित असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी यावेळी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments